Friday, 7 April 2023

वनौषधी वनस्पती

  

वनौषधी वनस्पती 

उतरण ( Pergulari daemia ) हृदयाच्या आकाराची मऊ पाने असलेला वेल , अनेक ठिकाणी बोरीच्या झाडावर याचा वेल चढला आहे व याची दोन फळाची बोंड फुटून त्यातील कापूस बिजा सह सर्वत्र पसरल्या आहेत .तर काही ठिकाणी याची सुंदर नाजूक फुले सुद्धा नजरेस भरत आहेत . कफ वात कमी करते व मूळव्याध व त्वचा विकार मध्ये पाने वापरतात .


      वासन वेल ( Cocculus hirsutus )हिला जलजमनी अस सुद्धा म्हणतात कारण हीचा पाला कुटून पाण्यात टाकला असतात पाणी बुळबुळीत थोड घट होत म्हणून , मी करून पाहिले पाणी बुळबुळीत व थोड कमी पातळ होते .हीची पाने एक आड एक उगवतात व छोटीसी पिवळे फुल लागतं , गुंजा सारखी आधी हिरवी व पिकल्यावर काळी जांभळी होणारी फळ लागतात , सध्या फुल आहेत फळ दिसली नाहीत , आयुर्वेदात शुक्र धातूचा आजारात वापरतात , लघवीची जळजळ कमी करण्यास वापरतात .

कुटज ( Wrightia antidysenterica ) 

रत्यावरच हे झाड आहेत , झाड फुलांनी लदबदले आहे , अन्य ठिकाणी शेंग म्हणजे दोन हिरव्या लांब कड्या ज्या शेवटी जोडलेल्या असतात . आयुर्वेदात ही खूपच कामाची पोटाचे विकार , संडास लागली , मूळव्याध त्यातही रक्तज मूळव्याध किंवा रक्ताची संडास असेल तर उपयोगात आणली जाते , शेगेतील बी ला इंद्रयव म्हणतात व ती सुद्धा पोटंच्या समस्यांवर गुणकारी आहे , कुटज घन वटी , कुटजारिष्ट अशी काही हीची प्रसिद्ध औषधी .

#उतरण #कुटज #इंद्रयव 

🌄🌿🌱🌴🍀🌳🍃☘️🌍




2 comments:

  1. Khup chan mahiti dile tumhi..khup lokana mahiti nahi he vanspati.va yanche upay

    ReplyDelete